पीएम किसान सन्मान निधीतील अपात्रांवर कारवाईचा बडगा; अपात्रांनी नाव हटवण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६००० रुपये जमा केले जातात.

ही रक्कम वर्षात तीन हप्तांच्या स्वरुपात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. 

मात्र काही अपात्र लोक जाणीवपूर्वक किंवा अनावधानाने या योजनेचा लाभ घेत आहेत.

यामुळे सरकारने या योजनेतील अपात्र लोकांची माहिती मानकांनुसार पोर्टलवर जाहीर केली आहे.

तसेच आत्तापर्यंत ज्या अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचे काम सुरु आहे.

यामुळे अपात्र शेतकऱ्यांना या योजनेतून हटवण्याचे कामही सुरु आहे.

यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेतील अपात्र लोक खालील काही सोप्या टिप्स वापरुन आपले नाव कमी करु शकतात.

१) सर्व प्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.

२) आता ‘Voluntary Surrender of PM Kisan Benefits’ वर क्लिक करा.

३) तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका आणि नंतर ‘Generate OTP’ वर क्लिक करा.

४) OTP टाकल्यानंतर तुम्ही घेतलेले सर्व हप्ते स्क्रीनवर दाखवले जातील.

५ ) यानंतर, ‘तुम्हाला Whether you do not want to take advantage of this scheme and want to surrender’ असा प्रश्न येईल. तर यातील होय वर क्लिक करा.