PM KISAN : पीएम किसान सन्मान योजना: बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता प्रत्येक गावात उपलब्ध

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार प्रती हप्ता या प्रमाणे सहा हजार प्रती वर्षी लाभ देण्यात येतो.

या योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मे किंवा जून महिन्यात जमा होणार आहे.

केंद्र शासनाने 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींना त्यांचे बँक खाते (Bank Account) आधार क्रमांकास (Aadhaar Number) जोडणे बंधनकारक केले आहे.

त्यामुळे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता प्रत्येक गावात उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

लाभार्थीना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. 

 राज्यात सद्यस्थितीत 12.91 लाख लाभार्थींची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत.

 त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थींच्या खात्यात 14 व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. 

मात्र आधार जोडणी पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे.