PM Kisan Yojna: पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता लवकरच, मात्र 'या' शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ

दर 4 महिन्यांच्या अंतराने 2-2 हजार रुपये 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात.

सध्या या योजनेचे 13 हप्ते जारी करण्यात आले आहेत. 

आता पुढील हप्ता मे किंवा जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

या योजनेच्या 13व्या हप्त्यात 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे.

सध्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींची पडताळणी सुरू आहे.

ही नोंदणी चुकल्याने अनेक शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात येत आहेत.

याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांना पीएम किसान योजनेचे पुढील हप्तेही नाकारले जात आहेत.

जे शेतकरी सरकारी नोकरी करत नाहीत आणि प्राप्तिकर भरत नाहीत, तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

ही योजना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू आहे. नियमांनुसार कुटुंबातील एका सदस्यालाच या योजनेचा लाभ मिळू शकतो.